महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, १४ विद्या आणि ६४ कलांच्या अधिष्ठात्या गणरायाचे आज आगमन झाले. स्वाईन-फ्ल्यु, वाढता दहशतवाद, जागतीक मंदी, अपुरा पाऊस आणि त्या अनुषंगाने येऊ घातलेला दुष्काळ, नोकऱ्यांवर कोसळलेली बेकारीची कुऱ्हाड या आणि अश्या अनेक विघ्नांच्या पार्श्वभुमीवर बाप्पाचे आगमन झाले आहे. डेडलाईन्स, रिलिझेस, परफॉर्मंन्स अश्या अनेक गोष्टींशी नाळ जोडल्या गेलेल्या मानवाप्रमाणेच या विघ्नहर्त्याला या [...]





















